अनिल अंबानींशी निगडीत मालमत्तांवर ईडीचे छापे
अनिल अंबानींशी निगडित मालमत्तांवर ईडीचे छापे
मुंबई, ता. ६ ः कर्ज घोटाळ्याचा आरोप असलेले उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांशी संबंधित मुंबई आणि हैदराबाद येथील सुमारे १२ कार्यालये, निवासस्थानांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापे टाकले.
अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांविरोधात कोट्यवधी रुपयांचा कर्ज घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल ईडीने तीन प्रकरणे नोंदवली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणांच्या तपासासाठी विशेष पथक (एसआयटी) नेमले आहे. शुक्रवारी मुंबई, हैदराबादेतील १० ते १२ ठिकाणांवर ईडीच्या एसआयटीने एकाचवेळी छापा घालून शोधाशोध केल्याचे सांगण्यात आले.
गेल्याच आठवड्यात ईडीने अंबानी यांचे पाली हिल येथील निवासस्थान अबोड जप्त केले. या १७ मजली निवासस्थानाचे बाजारमूल्य ३,७१६ कोटी रुपये असावे, असा अंदाज आहे. ईडीने आतापर्यंत अनिल अंबानी समूहाची १५,७०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. याशिवाय बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरून अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने स्वतंत्र गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

