डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती शासनाच्या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी घेतला आढावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती शासनाच्या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

Published on

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १३५ वी जयंती साजरी होत आहे. राज्य शासनातर्फे भीम जयंतीच्या केलेल्या पूर्वतयारीचा आढावा आज रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित शासकीय बैठकीत घेतला. या वेळी पोलिस, रेल्वे पोलिस, मुंबई महापालिका, राज्य शासनाच्या समाज कल्याण विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी पुज्य भंते डॉ. राहुलबोधी महाथेरो, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, समन्वय समितीचे नागसेन कांबळे, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आदि उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबईत चैत्यभूमी येथे, नागपूरमधील दीक्षाभूमी यासह राज्यभरातील विविध स्मारकात राज्य शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा आणि सुरक्षेच्या तयारीचा आठवले यांनी आढावा घेतला. मुंबईत चैत्यभूमी तसेच गोराई येथील पॅगोडा येथे भीम जयंतीनिमित्त हजारो बौद्ध उपासक, भीम अनुयायी भेट देतात. त्यांच्या सुरक्षेचा विविध सोयीसुविधा पुरविण्याबाबत रामदास आठवले यांनी माहिती घेतली. १४ एप्रिलला चैत्यभूमी येथे दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात नामवंत कलाकारांसह आंबेडकरी चळवळीतील भीमशाहिरांनाही आंबेडकरी लोककलावंतांना संधी देण्याची सूचना करण्यात आली. तसेच भीम जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे १४ आणि १५ एप्रिलला कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी राज्य शासनातर्फे देण्यात यावी. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com