वृद्धाला आभासी अटकेत ठेवून २.२५ कोटी उकळले
वृद्धाला आभासी अटकेत ठेवून २.२५ कोटी उकळले
भामट्यांना बँक खाते पुरवणाऱ्याला अटक
मुंबई, ता. ६ ः पश्चिम उपनगरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास आभासी अटकेत ठेवून २.२५ कोटी रुपये उकळणाऱ्या सायबर भामट्यांच्या साथीदारास मुंबई पोलिसांनी अलीकडेच गुजरातेतून अटक केली. या गुन्ह्यात ज्येष्ठ नागरिकास विश्वासात घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे माजी प्रमुख सदानंद दाते यांची बनावट सही असलेली एक नोटीस दाखवण्यात आली होती.
सायबर पोलिसांनी (उत्तर विभाग) किशन मकवानाला अटक केली. त्याने सायबर भामट्यांना आपले बँक खाते फसवणुकीची रक्कम वळवण्यासाठी कमिशनपोटी दिले होते. तांत्रिक तपासातून सायबर पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात तक्रारदार वृद्धाला अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला. पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांना कोट्यवधींची आर्थिक रसद पुरवल्याचा आपल्याविरोधात आरोप आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएसह लखनऊ एटीएस करत आहे, असे सांगत वृद्धाला भीती घालण्यात आली. आधार कार्डआधारे आपल्या नावे उघडण्यात आलेल्या बँक खात्यावरून व्यवहार झाले असून कमिशन म्हणून या खात्यावर ७० लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे आपल्या बँक व्यवहारांचा तपास करावा लागेल. त्यासाठी आपल्या आणि कुटुंबीयांच्या बँक खात्यावरील जमा, गुंतवणूक मोडून सांगू त्या खात्यावर पाठवावी लागेल. तपासात निर्दोष आढळल्यास ही रक्कम परत केली जाईल, असे या वृद्धाला सांगण्यात आले.
आणखी भीती घालण्यासाठी एनआयए आणि दाते यांचे नाव वापरून एक बोगस नोटीस वृद्धाला ऑनलाइन पाठवण्यात आली. तपासात सहकार्य न केल्यास १० वर्षांचा कारावास आणि पाच लाखांचा दंड होईल, असे नमूद होते. त्यामुळे वृद्धाने भामटे सांगतील तसे केले आणि तब्बल २.२५ कोटी रुपये विविध खात्यांवर जमा केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

