व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता स्थगित

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता स्थगित

Published on

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता स्थगित
हॉटेल व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पश्चिम आशियामध्ये इराण आणि इस्राईल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता भारतात उमटू लागले आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती ग्राहकांना गॅसचा तुटवडा भासू नये, याला सरकारने प्राधान्य दिले आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या नव्या ऑर्डर न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला फटका बसणार आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मोठ्या उद्योगांमध्ये केला जातो. धातू वितळवणे, पावडर कोटिंग यांसारख्या तांत्रिक कामांसाठीही हा गॅस अत्यावश्यक असतो. सरकारकडून या प्रकारच्या सिलिंडरवर कोणतेही अनुदान दिले जात नसल्याने त्यांच्या किमती आधीच जास्त असतात. आता पुरवठाच बंद झाल्यामुळे उद्योगांचे चक्र थांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आखाती देशांमधील हे युद्ध किती काळ चालते, यावरच भारताची पुढील इंधन स्थिती अवलंबून असणार आहे.
==
व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावर अचानकपणे बंदी किंवा लक्षणीय निर्बंध घालल्यास संपूर्ण अन्न सेवा उद्योगावर गंभीर परिणाम होऊ शकतात. लाखो कामगारांच्या तसेच अनेक लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांच्या उपजीविकेवर परिणाम होईल. त्यामुळे तयार जेवणावर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांच्या दैनंदिन अन्नपुरवठ्यातही व्यत्यय येईल. अधिकाऱ्यांनी अनपेक्षित आर्थिक आणि सामाजिक व्यत्यय टाळण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि अन्नसेवा आस्थापनांना व्यावसायिक एलपीजीचा सतत आणि अखंड पुरवठा सुनिश्चित करावा.
-प्रदीप शेट्टी, प्रवक्ते, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडिया

==

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com