एलएलबी,बीएड.एमएड व बीपीएडसाठी ९० हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार

एलएलबी,बीएड.एमएड व बीपीएडसाठी ९० हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार

Published on

अर्जातील दुरुस्तीसाठी ऑनलाइन सुविधा
मुंबई, ता. ७ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एलएलबी (तीनवर्षीय), बीएड -एमएड (तीन वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) व बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (बीपीएड) या अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश नोंदणी ३ मार्चला संपली. या तिन्ही अभ्यासक्रमासाठी ९० हजार १२६ विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी अर्जामध्ये जर काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठी ९ मार्च ते ११ मार्चदरम्यान ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, एलएलबी (तीनवर्षीय), बीएड + एमएड व बीपीएडच्या या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क अदा करून पूर्ण केली आहे. त्यापैकी काही विद्यार्थांकडून अर्ज भरताना अनावधानाने काही चुका झाल्या असतील, तर त्या दुरुस्तीसाठीची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही दुरुस्तीची सुविधा ९ ते ११ मार्चदरम्यान उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com