मुंबईच्या हवेत सुधारणा; सरासरी एक्यूआय ६८ वर, मात्र देवनार-अंधेरीत हवा अजूनही प्रदूषित

मुंबईच्या हवेत सुधारणा; सरासरी एक्यूआय ६८ वर, मात्र देवनार-अंधेरीत हवा अजूनही प्रदूषित

Published on

मुंबईच्या हवेत सुधारणा
एक्यूआय ६८ वर, मात्र देवनार-अंधेरीत हवा प्रदूषित

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ७ : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना भेडसावणाऱ्या प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. शहराचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ६८ पर्यंत खाली आला असून, हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदवण्यात आली आहे; मात्र वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), देवनार आणि अंधेरी यांसारख्या काही परिसरांमध्ये अद्यापही हवेची गुणवत्ता खालावलेलीच आहे.
​मार्च महिन्याच्या सुरुवातीला मुंबईचा एक्यूआय ९० ते १००च्या दरम्यान होता. ४ मार्चला हा निर्देशांक ९४ वर होता. जो ७ मार्चला ६८ वर पोहोचला. हवेतील या सुधारणेमुळे मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येत असला तरी संवेदनशील व्यक्तींना काही प्रमाणात श्वसनाचा त्रास जाणवण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

​मुंबईतील ३० पैकी २१ सक्रिय केंद्रांच्या आकडेवारीनुसार, कांदिवली पूर्व (३०), सायन (३८) आणि बोरिवली पूर्व (३९) या भागात हवेची गुणवत्ता सर्वात उत्तम नोंदवण्यात आली आहे. कुलाबा, वरळी आणि पवई यांसारख्या भागातही हवेचा दर्जा ५० ते ६५च्या दरम्यान राहिला आहे. ​मुंबईची सरासरी स्थिती सुधारत असताना देवनार (१०९) आणि अंधेरी पूर्व (१०४) या भागात मात्र प्रदूषण कायम आहे. या ठिकाणी हवेची गुणवत्ता ‘वाईट’ श्रेणीत असल्याने स्थानिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढते बांधकाम आणि वाहनांची वर्दळ ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे.
.........
​प्रमुख ठिकाणची स्थिती (एक्यूआय) :
​सरासरी मुंबई : ६८ (समाधानकारक)
​देवनार : १०९ (खराब)
​चकाला-अंधेरी पूर्व : १०४ (खराब)
​बोरिवली पूर्व : ८९ मध्यम
​वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) : ८२ मध्यम
​शिवाजीनगर : ९३ मध्यम
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com