दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आयपीएफ महाहेल्पलाइनची मदत

दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आयपीएफ महाहेल्पलाइनची मदत

Published on

दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आयपीएफ महाहेल्पलाइनची मदत
मुंबई, ता. ८ : दुबईमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी प्रवासी व समुदायाला मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आयपीएफ महाहेल्पलाइन ही सेवा, सध्या इराण-अमेरिका संघर्षामुळे दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी विशेष हेल्पलाईन म्हणून सक्रिय करण्यात आली आहे. ही हेल्पलाईन सुरू झाल्यानंतर एका दिवसात १,२०० हून अधिक प्रवाशांकडून मदतीची विनंती आल्याची माहिती दुबई येथून या उपक्रमाचे नेतृत्व करणारे राहुल तुळपुळे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने सुरू असलेली आयपीएफ महाहेल्पलाइन (+९७१ ५० ३६५ ४३५७) ही सेवा दुबईमधील पाच शहरांमध्ये कार्यरत असलेल्या २० हून अधिक स्वयंसेवकांच्या पथकाद्वारे २४ तास चालवली जात आहे. अडकलेल्या प्रवाशांना हॉटेल मुक्काम वाढविणे, अन्न व औषधे उपलब्ध करून देणे, तात्पुरती निवासव्यवस्था, वाहतूक सुविधा तसेच दूतावासाशी समन्वय अशा विविध प्रकारची मदत केली जात आहे. याशिवाय स्थानिक डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक प्रिस्क्रिप्शन मिळवून अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र वैद्यकीय सहाय्य पथकही कार्यरत आहे.

हेल्पलाइनचे पथक दुबईतील भारतीय दूतावासाशीही सातत्याने समन्वय साधून आहे. पडताळणी केलेले अद्ययावत अपडेट्स प्रवाशांपर्यंत व्यावसायिक पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या व्हॉट्सॲप समन्वय गटामार्फत पोहोचवले जात आहेत. गेल्या चार दिवसांत दुबई व मस्कतमधून ५००हून जास्त प्रवासी भारतात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दुबई येथील भारतीय महावाणिज्य दूत तसेच आयपीएफ महाहेल्पलाइनच्या व्यवस्थापन पथकाशी सातत्याने संपर्कात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com