बीएसईचा विस्तार बीकेसीत होणार
‘बीएसई’चा विस्तार बीकेसीत!
भूखंडाबाबत एमएमआरडीएकडे विचारणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : व्यावसायिक हब असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात देश-विदेशातील कार्पोरेट कंपन्यांकडून कार्यालये थाटली जात आहेत. आता बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजकडून (बीएसई) आपला विस्तार येथे करणार असल्याचे समोर आले आहे. बीएसईने आपला विस्तार करण्यासाठी बीकेसी येथे भूखंड मिळावा म्हणून एमएमआरडीएकडे विचारणा केली आहे.
एनएसईकडून बीकेसीमध्ये आपला विस्तार केला जाणार असतानाच आता बीएसईनेही त्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुंदररामन राममूर्ती यांनी मुख्य नियामक अधिकारी कमला कंथाराज यांच्यासह एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावरून बीकेसीचे देशातील अग्रगण्य वित्तीय व व्यापारी केंद्र म्हणून स्थान बळकट झाल्याचे स्पष्ट होत आहे.
योग्य भूखंडाचा शोध
अशा धोरणात्मक गुंतवणुकीच्या माध्यमातून मुंबईत जागतिक दर्जाच्या वाणिज्य पायाभूत सुविधांच्या विकसित करण्यावर एमएमआरडीएचा विशेष भर आहे. बीएसईच्या मागणीच्या अनुसरून योग्य भूखंड शोधून त्याच्या वाटपाच्या प्रक्रियेला अंतिम रूप देण्यासाठी एमएमआरडीए, बीएसईसोबत काम करणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

