मुंबईच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी पालिकेचे पाऊल;
पुनर्विकासाला गती मिळणार!
‘एआय’आधारित विशेष पोर्टलसाठी महापालिकेची निविदा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहरासाठी मुंबई रिडेव्हलपमेंट फॅसिलिटेशन पोर्टल (एमआरएफपी) हे अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठ विकसित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी अनुभवी आयटी कंपन्यांकडून ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत.
हे नवीन पोर्टल केवळ माहिती देणारे संकेतस्थळ नसून, ते आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असणार आहे. याद्वारे पुनर्विकासासाठी आवश्यक असणारी सिंगल विंडो यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने जीआयएस (जीआयएस) आधारित मॅपिंग, डॅशबोर्ड आणि कामाची स्वयंचलित प्रणाली असेल. हे पोर्टल पालिकेच्या आणि सरकारच्या इतर विभागांच्या यंत्रणेशी थेट जोडले जाणार असल्याने कागदपत्रांची पूर्तता आणि मंजुरी प्रक्रियेत वेळ वाचणार आहे.
कायद्याचे पालन बंधनकारक
महापालिकेच्या मुख्य अभियंता (विकास नियोजन) विभागामार्फत ही प्रक्रिया राबवली जात आहे. निविदेची कागदपत्रे १६ डिसेंबर २०२५ पासून उपलब्ध करून देण्यात आली असून, १७ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. १८ मार्च २०२६ला तांत्रिक निविदा उघडल्या जातील. निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपन्यांना डेटा सुरक्षा आणि केंद्र सरकारच्या डीपीडीपी कायद्याचे पालन करणे बंधनकारक असेल. या पोर्टलच्या माध्यमातून मुंबईतील हजारो गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासाचे प्रस्ताव मांडणे आणि त्यांचा पाठपुरावा करणे अधिक सुलभ होणार आहे.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

