मुंबईत व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण संपन्न

मुंबईत व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण संपन्न

Published on

व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण उत्साहात
मुंबई, ता. ८ ः प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई येथे दोनदिवसीय जिल्हास्तरीय व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम व उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ५ ते ६ मार्च या कालावधीत हे झाले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबईच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ अधिव्याख्याता सुनीता राठोड, कुमार पाटील तसेच विषय साधन मार्गदर्शक अर्चना जोशी यांची उपस्थिती होती. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथून प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी या दोनदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणात कामकाज पाहिले. यामध्ये जयवंत कुलकर्णी, अखलाख शेख, रोशनी वाडेकर आणि स्वप्ना शिंदे यांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com