व्ही. एन. देसाई रुग्णालयाला मानवाधिकार आयोगाची नोटीस

व्ही. एन. देसाई रुग्णालयाला मानवाधिकार आयोगाची नोटीस

Published on

व्ही. एन. देसाई रुग्णालयाला मानवाधिकार आयोगाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या नव्याने दुरुस्त केलेल्या तिसऱ्या मजल्यावर २७ जुलै २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसात छताला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याप्रकरणी मानवाधिकार आयोगाकडून रुग्णालय प्रशासन आणि मुंबई महापालिका यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. या प्रकरणात तक्रारदार ॲड. तुषार भोसले यांनी रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करीत तक्रार दाखल केली आहे.
रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडून सादर केलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे, की नियोजित वेळेपेक्षा आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने गळती झाली. मात्र या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, काम पूर्ण होण्यापूर्वीच रुग्णांना त्या मजल्यावर हलवण्यात आले का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तक्रारीनुसार माजी वैद्यकीय अधीक्षकांनी लिखित आदेश देऊन नर्सिंग कर्मचाऱ्यांना रुग्ण हलविण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्यापूर्वी रुग्णांना त्या मजल्यावर हलवण्यात आले असल्याचा मुद्दा पुढे आला आहे. रुग्णालय प्रशासनाने आणखी एक कारण देताना छतावर सौर पॅनेल आणि इतर युटिलिटी असल्यामुळे पूर्ण वॉटरप्रूफिंग करणे शक्य झाले नाही, असे म्हटले आहे. मात्र यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रुग्णांना गळतीचा त्रास सहन करावा लागणार का तसेच दुरुस्तीच्या कामासाठी पुन्हा नव्याने टेंडर काढले जाणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार असून, मानवाधिकार आयोगाकडून रुग्णांच्या सुरक्षेबाबत महापालिका आणि रुग्णालय प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com