शाळेत खेळताना विद्यार्थ्याने गिळली पिन

शाळेत खेळताना विद्यार्थ्याने गिळली पिन

Published on

शाळेत खेळताना विद्यार्थ्याने गिळली पिन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याने खेळताना चुकून पुश पिन गिळल्याची घटना घडली. ही पिन मुलाच्या श्वसननलिकेत अडकली होती. दरम्यान, कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार करीत कोणतीही चिरफाड न करता ही पिन बाहेर काढत मुलाचा जीव वाचवला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षानगर परिसरात राहणारा इस्माईल अब्दुल खान हा विद्यार्थी दोन दिवसांपूर्वी शाळेत मित्रांसोबत खेळत असताना ही घटना घडली. मुलाचे वडील करीम यांनी सांगितले, की खेळताना मजेत त्याने पिन तोंडात धरली होती. अचानक ती चुकून त्याच्या घशात गेली. घटनेनंतर शाळा प्रशासनाने तत्काळ विद्यार्थ्याला तपासणीसाठी कूपर रुग्णालयात पाठवले. एक्स-रे केल्यानंतर पिन फुप्फुसाजवळ अडकली असल्याचे डॉक्टरांना आढळले. कूपर रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे डॉ. शशिकांत म्हाशल यांनी सांगितले, की अशा प्रकरणांमध्ये साधारणपणे वस्तू अन्ननलिकेत जाते; मात्र या प्रकरणात पिन श्वसननलिकेत गेली होती. त्यातही पिनचा टोकदार भाग वरच्या दिशेने असल्यामुळे ती काढताना नलिकेला इजा होण्याचा धोका होता. विभागप्रमुख डॉ. निनाद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अ‍ॅनेस्थेशिया विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता शेट्टी यांच्या सहकार्याने ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रियेच्या मदतीने कोणतीही शस्त्रक्रिया न करता पिन काढण्यात आली. ही प्रक्रिया सुमारे अर्ध्या तासात पूर्ण करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com