लग्नासाठी आरोपीचा अंतरिम जामीनासाठी अर्ज

लग्नासाठी आरोपीचा अंतरिम जामीनासाठी अर्ज
Updated on

लग्नासाठी आरोपीचा अंतरिम जामिनासाठी अर्ज

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या बारा आरोपींपैकी एकाने आपल्या लग्नासाठी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आहे. आरोपी ऋतिक यादवने ११ मार्चला आग्रा येथे होणाऱ्या आपल्या विवाहासाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्याची मागणी केली.

महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मकोका) न्यायालयाचे न्या. सत्यनारायण नवंदर यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ॲड. दिलीप शुक्ला यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जात, यादवचा विवाह ११ मार्चला आग्रा या मूळ गावी होणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व १२ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यादव हा १४ फेब्रुवारीला हरियाना आणि उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी एक आहे. त्यामध्ये शूटर दीपक शर्माचाही समावेश आहे. १ फेब्रुवारीला जुहू येथील रोहित शेट्टीच्या नऊ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर किमान पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकरने समाजमाध्यमांवर पोस्ट करून या घटनेची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com