म्हाडातील ‘हिरकणी कक्ष’ घेणार मोकळा श्वास

म्हाडातील ‘हिरकणी कक्ष’ घेणार मोकळा श्वास
Published on

म्हाडातील ‘हिरकणी कक्ष’ घेणार मोकळा श्वास
मुंबई, ता. १० : म्हाडा मुख्यालयातील पार्किंगच्या गराड्यात अडकलेल्या हिरकणी कक्षाला आता मोकळा श्वास मिळणार आहे. हा कक्ष अडगळीत असल्याने त्याचा वापर होत नव्हता, त्याची दखल घेत म्हाडाने हा कक्ष नागरी सुविधा केंद्राच्या जवळ स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी आपल्या बाळाला स्तनपान करताना महिलांची मोठी गैरसोय होते, त्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरात म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून ५० हिरकणी कक्ष उभारण्यात येणार होते. त्याचाच भाग म्हणून वांद्रे पूर्वेला म्हाडा मुख्यालयात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र, त्याच्या आजूबाजूला चारचाकी वाहने उभी केलेली असतात. तसेच या ठिकाणी पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत म्हाडाने हिरकणी कक्षाच्या दरवाजासमोर उभ्या केल्या जाणाऱ्या गाड्या हटवण्याची कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही त्याचा वापर होत नव्हता. त्यामुळे म्हाडाने हा कक्ष नागरी सुविधा कक्षाकडे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी म्हाडा प्राधिकरणाने मंजुरी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com