संतभूमी रक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन

Published on

मुंबई, ता. १० : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची तपोभूमी मानल्या जाणाऱ्या देहूजवळील भामचंद्र, भंडारा आणि घोराडा डोंगरांचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता. १०) आझाद मैदानात संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वारकरी, संतसाहित्य अभ्यासक, पर्यावरणप्रेमी आणि भाविकांनी या आंदोलनात सहभागी होत सरकारकडे तातडीने कारवाईची मागणी केली.

संघर्ष समितीचे अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रामुख्याने पंढरपूर येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे संत सेवकराम दादा, संत मनोहर साबळे, मनोज चौबे, मनहारी बाबा आदी संतांनी सहभाग घेतला. समितीच्या मते २०११मध्ये राज्य शासनाने या डोंगरांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र नंतर २०१२मध्ये या अधिसूचनेत सुधारणा करून संरक्षित क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले. त्यामुळे औद्योगिक विकास, खाणकाम, बांधकाम आणि अवैध उत्खननामुळे या डोंगरांचे नैसर्गिक सौंदर्य आणि पावित्र्य धोक्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com