

म्हाडा ‘त्या’ ९६ इमारती पावसाळ्यापूर्वी घेणार ताब्यात
राहिवाशांना भाड्याचा पर्याय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबईतील उपकर प्राप्त (सेस) इमारतीच्या म्हाडाने मे २०२५मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ९६ इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले होते. त्या इमारती कोसळून अपघात घडू नये म्हणून म्हाडाने पावसाळ्यापूर्वी त्या सक्तीने रिकाम्या करून ताब्यात घेण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच संबंधित राहिवाशांना संक्रमण सदनिका किंवा २० हजार रुपये भाड्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.
म्हाडाने मागील वर्षी पावसाळ्यापूर्वी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या इमारती अतिधोकादायक आढळून आल्या होत्या. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने संबंधितांना नोटीस देत इमारती रिकाम्या करण्याबाबत बजावले होते. मात्र, राहिवाशांनी त्याला विरोध केल्याने त्या इमारती रिकाम्या करता आल्या नव्हत्या. दरम्यान, एखादी इमारत कोसळून अपघात घडल्यास म्हाडाला जबाबदार धरले जाते. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हाडाने संबंधित ९६ इमारतीत वास्तव्यास असलेल्या सुमारे २,४०० राहिवाशांना पुन्हा नोटीस देऊन सक्तीने सदनिका रिकाम्या करण्याची कार्यवाही करण्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे नियोजन असल्याचे मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
...
म्हाडासमोर प्रश्न
संक्रमण सदनिका किंवा भाडे हवे असेल, तर संबंधित राहिवाशांनी म्हाडाच्या वॉर्ड कार्यालयात घराचे पुरावे सादर करावेत, असे आवाहन म्हाडाने नोटीस पाठवत केले होते. मात्र, रहिवाशांकडून त्याबाबत कोणतीच पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे पुढे काय करावे, असा प्रश्न म्हाडासमोर उभा राहिला असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.