विधानभवनजवळ आत्मदहनाचा प्रयत्न

विधानभवनजवळ आत्मदहनाचा प्रयत्न
Published on

विधानभवनाजवळ आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई, ता. ११ ः सोलापूरहून मुंबईत आलेल्या एका तरुणाने बुधवारी (ता. ११) विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. दादासो काळसैत (३८) असे या तरुणाचे नाव असून बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेत मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात आणले. हा तरुण माढा तालुक्यातील टाकळी गावचा रहिवासी आहे. गावातील लोहार समाजाच्या जमिनीवर विश्वकर्मांचा पुतळा अवैधरीत्या उभारण्यात आला होता. नगर पंचायतीने तो काही दिवसांपूर्वी हटविला. त्यावरून हा तरुण नाराज असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाल्याचे पोलिस उपआयुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. दरम्यान, या तरुणाविरोधात दाखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com