

इंडक्शन स्टोव्हच्या मागणीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : देशात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची टंचाई सुरू असल्याने इंडक्शन स्टोव्हच्या मगणीत वाढ झाली आहे. अनेक नागरिक तसेच हॉटेल व्यावसायिक स्वयंपाकाच्या पर्यायी साधनांच्या शोधात असल्याने दुकाने आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर इंडक्शन स्टोव्हची खरेदी झपाट्याने वाढली आहे.
स्थानिक विक्रेते तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन यांनीही मागणी वाढल्याचे सांगितले आहे. काही ग्राहक एलपीजीच्या तुटवड्यामुळे तातडीने इंडक्शन स्टोव्ह खरेदी करीत आहेत. काही जण भविष्यातील परिस्थिती पाहता खरेदी करीत आहेत. फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार ते पाच दिवसांत इंडक्शन कुकटॉपच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून, मागील तीन ते चार आठवड्यांच्या तुलनेत विक्री जवळपास तीन पट वाढली आहे. ॲमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, ॲमेझॉनच्या ऑनलाइन साइटवर मागील २४ तासांत इंडक्शन कुकटॉपची मागणी सामान्य दिवसांच्या तुलनेत तब्बल २० पट वाढली आहे. मुंबईतील अनेक दुकानदारांनीही अशाच प्रकारचा ट्रेंड दिसत असल्याचे सांगितले आहे. मुंबईतील एका विक्रेत्याने सांगितले की, गेल्या आठवड्यात फक्त दोन ते तीन इंडक्शन स्टोव्ह विकले जात होते. आता इंडक्शन स्टोव्हची विक्री १०पर्यंत वाढली आहे. गॅस स्टोव्हची विक्री घटली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.