

पूर्व द्रुतगती मार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू
मुंबई, ता. ११ : पूर्व द्रुतगती मार्गावर दोन दुचाकींमध्ये घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. यातील एका दुचाकीवरून तिघे विनाहेल्मेट भरधाव प्रवास करीत होते. विक्रोळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कहार (वय २०), प्रवीण यादव (१७) अशी मृत तरुणांची नावे आहेत. जोगेश्वरी येथे राहणारे अमित पवार मंगळवारी दुपारी दुचाकीवरून कामावर निघाले होते. त्यांची दुचाकी पूर्व द्रुतगती मार्गावर असताना त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिली, त्यामुळे ते पडले. तर धडक देणारी दुचाकी त्याच वेगात रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली. अमित यांच्यासह अन्य दुचाकीवरून प्रवास करणारे राज, प्रवीण आणि गुलशन यादव गंभीर जखमी झाले. त्यातील राज व प्रवीण यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर अमित व गुलशन यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.