निम्म्या मुंबईकरांना चांगली झोप नाही!
निम्म्या मुंबईकरांना चांगली झोप नाही!
जागतिक झोप दिन; निद्रा ही चैन नव्हे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत प्रत्यक्षात झोपेची गंभीर समस्या समोर येत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) प्रौढांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार शहरातील सुमारे निम्म्या नागरिकांना पुरेशी आणि दर्जेदार झोप मिळत नसल्याचे आढळून आले आहे.
या अभ्यासात एमएमआरमधील ७५८ प्रौढांचा समावेश करण्यात आला होता. त्यात जवळपास ४९.९ टक्के लोकांना चांगली झोप मिळत नसल्याचे दिसून आले. तसेच सुमारे ३० टक्के नागरिकांना दिवसभर झोप येणे किंवा थकवा जाणवणे, अशा समस्या भेडसावत असल्याचेही समोर आले आहे. शहरातील धावपळ, ताणतणावपूर्ण जीवनशैली आणि कामाचे अनियमित तास यामुळे झोपेवर परिणाम होत असल्याचे आजच्या जागतिक झोप दिनी तज्ज्ञांनी मांडले.
अभ्यासानुसार फक्त १८.३ टक्के लोकांना दररोज सात तासांपेक्षा जास्त झोप मिळते, तर सुमारे २३ टक्के नागरिकांना पाच तासांपेक्षा कमी झोप मिळते. झोपेची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास हृदयरोग, मधुमेह, मानसिक ताण तसेच कार्यक्षमता कमी होण्याचा धोका वाढू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, नियमित झोपेची वेळ पाळणे, झोपण्यापूर्वी मोबाईल व स्क्रीनचा वापर कमी करणे आणि ताणतणाव नियंत्रणात ठेवणे, यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. जागतिक झोप दिनाच्या पार्श्वभूमीवर झोपेचे महत्त्व ओळखून जीवनशैलीत बदल करण्याची गरज अधोरेखित करण्यात येत आहे.
...
मुंबईसारख्या धावत्या शहरात कामाचा ताण, स्क्रीनचा वाढलेला वापर आणि उशिरापर्यंत जागरण यामुळे लोकांचा झोपेचा कालावधी कमी होत चालला आहे. नियमित सात-आठ तासांची झोप न मिळाल्यास शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते आणि दीर्घकाळात ताण, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच नैराश्य यांचा धोका वाढतो. झोप ही चैनीची गोष्ट नसून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक गरज आहे.
- डॉ. सुरेश पाटील, प्रमुख, इंडियन सायकिॲट्रिस ऑर्गनायझेशन वेस्ट झोन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

