निवासी डॉक्टरांच्या आंतरजिल्हा बदलीला हिरवा कंदील
निवासी डॉक्टरांच्या आंतरजिल्हा बदलीला हिरवा कंदील
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : जिल्हा रेसिडेन्सी प्रोग्रामअंतर्गत निवासी डॉक्टरांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. १९ डिसेंबर २०२५ पर्यंत आवश्यक ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ घेऊन आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या सर्व निवासी डॉक्टरांचे अर्ज विद्यमान प्रक्रियेनुसार विचारात घेतले जातील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्या कालावधीत अर्ज केलेल्या डॉक्टरांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, १९ डिसेंबर २०२५ नंतर अर्ज केलेल्या निवासी डॉक्टरांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झाल्यानंतर परवानगी दिली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयाचे रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन म्हणजे मार्ड संघटनेकडून स्वागत करण्यात आले आहे. यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता दूर होऊन त्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगण्यात आले. मार्डच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत आंतरजिल्हा बदलीसाठी एनओसी घ्या, असा नियम होता; मात्र १९ डिसेंबरला दुसरा नियम काढत ती प्रक्रिया बंद केली, असे सांगण्यात आले; मात्र या नियमामुळे ज्यांनी एनओसी घेतले त्यांना अडचण येऊ लागली. त्यामुळे संबंधित मागणी करण्यात आली होती. त्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला.
़़़़़
१९ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज केलेल्या निवासी डॉक्टरांच्या मागण्यांचा सन्मान राखत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे. यामुळे निवासी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- डॉ. अथर्व शिंदे, नॅशनल एक्झिक्युटिव्ह फायमा व प्रवक्ते सेंट्रल मार्ड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

