‘जन आरोग्य’मध्ये सहभागी व्हा!

‘जन आरोग्य’मध्ये सहभागी व्हा!
Published on

‘जन आरोग्य’मध्ये सहभागी व्हा!
खासगी रुग्णालयांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य सरकारच्या एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेत अधिक सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
मुंबई महानगर क्षेत्रातील खासगी रुग्णालयांचा या योजनांमधील सहभाग वाढवण्यासाठी मंत्रालयात मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह काही आमदार, अधिकारी तसेच खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री आबिटकर म्हणाले, की गरीब व गरजू नागरिकांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा राज्य सरकारचा प्रमुख उद्देश आहे. मुंबईसारख्या महानगरात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना मिळावा, यासाठी नामांकित खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढणे अत्यावश्यक आहे. शासनाकडून या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
...
सरकार सातत्याने प्रयत्नशील!
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले, की राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार ही बैठक घेण्यात आली असून खासगी रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिसाद देत योजनांमध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com