यूपीआर

यूपीआर

Published on

देशात यूपीआय व्यवहार स्वीकारणारी राज्य बँक पहिली शिखर बँक

मुंबई, ता. १५ : सहकारातील सर्व संस्थांना आधुनिक डिजिटल पेमेंट प्रणालीशी जोडण्यासाठी आणि त्यांचे बँकिंग व्यवहार अधिक वेगवान व सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘एआरपे’ या तंत्रज्ञान कंपनीबरोबर करार करत स्वतंत्र यूपीआय स्वीकारकर्ता बँक म्हणून सेवा प्रकल्प सुरू केला आहे.
सध्या अनेक जिल्हा मध्यवर्ती आणि नागरी सहकारी बँकांना यूपीआय सेवा घेण्यासाठी व्यापारी बँकांवर अवलंबून रहावे लागते. मात्र, राज्य बँकेने यूपीआय स्वीकारणारी बँक हा दर्जा प्राप्त केल्याने सहकार क्षेत्रातील आर्थिक व्यवहार यापुढे सहकार व्यवस्थेच्या अंतर्गतच सुरक्षित राहतील, अशी माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने स्वत:चे यूपीआय हँडल राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, नागरी सहकारी बँका व विविध कार्यकारी संस्थाबरोबरच दूध संघ, साखर कारखाने व सहकारातील इतर सर्व संस्थांना देण्याचे ठरविल्याने या संस्थांना पेमेंट कलेक्शनसाठी आता शिखर बँकेचे अधिकृत यूपीआय हँडल वापरता येईल. या प्रकल्पामुळे सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार सुलभ व जलद होण्याबरोबरच त्यामध्ये अधिक पारदर्शकता येईल व सहकारावरील विश्वास वाढीस लागेल, असेही अनास्कर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com