स्वातंत्र्यवीर सावरकरांना
मरणोत्तर डी. लिट द्या!

स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर डी. लिट द्या!

Published on

स्वातंत्र्यवीर सावरकरांना
मरणोत्तर डी.लिट. द्या!
मुंबई, ता. १४ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी क्रांतिकारक, थोर विचारवंत, इतिहासकार, समाजसुधारक आणि साहित्यिक होते. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाला वैचारिक अधिष्ठान देणारे तसेच मराठी साहित्य व इतिहासलेखन समृद्ध करणारे मौलिक व दीर्घकालीन प्रभावी कार्य केले आहे. सावरकर हे तत्कालीन मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे पदवीधर आहेत. त्यांचे मुंबई विद्यापीठाशी असलेले शैक्षणिक संबंध लक्षात घेता त्यांना डी.लिट. ही पदवी प्रदान करावी, अशी मागणी सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरूखकर यांनी सिनेट सभेत केली. युवासेनेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी या मागणीस पाठिंबा दिला, तर प्राध्यापकांच्या ‘बुक्टो’ संघटनेची संमती नसल्याचे सिनेट सदस्य डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com