एशियाटिक निवडणूक स्थगितीचा कुमार केतकर पॅनलकडून निषेध
निवडणूक स्थगितीला
केतकर पॅनेलचा विरोध
एशियाटिकच्या स्वायत्ततेचे रक्षण करण्याचा निर्धार
मुंबई, ता. १४ : एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीला स्थगिती देण्याच्या धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाचा कुमार केतकर पॅनेलने निषेध नोंदविला आहे. केतकर पॅनेलच्या सदस्यांनी आज (ता. १४) दुपारी बैठक घेत संस्थेच्या स्वायत्ततेचे रक्षण करण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला.
यापूर्वी ८ नोव्हेंबर २०२५ला होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वारंवार शेवटच्या क्षणी होणाऱ्या हस्तक्षेपाबाबत केतकर पॅनेलने तीव्र आक्षेप नोंदवला. २२१ वर्षांची परंपरा असलेली एशियाटिक सोसायटी ही देशातील महत्त्वाची सांस्कृतिक आणि संशोधन संस्था आहे. तिच्या प्रशासनावर कोणताही न्यायिक, शासकीय किंवा राजकीय दबाव पडू नये, अशी अपेक्षा पॅनेलने व्यक्त केली. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशात छाननी समितीचा कार्यकाळ २७ सप्टेंबर २०२५ला संपल्यानंतर मंजूर झालेल्या नव्या सदस्यत्वांबाबत आक्षेप नोंदवण्यात आले; मात्र हे आक्षेप मतदानाच्या पूर्वसंध्येला का उपस्थित करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
---
नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे उल्लंघन
निवडणूक स्थगितीचा आदेश १३ मार्चला सायंकाळी सुमारे ५.३० वाजता संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला. ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला निवडणूक स्थगितीचा आदेश जाहीर केल्याने तो संबंधित पक्षांना वाचण्याची, समजून घेण्याची आणि त्यावर आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे व मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, पॅनेलने निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व उपलब्ध कायदेशीर आणि लोकशाही मार्गांचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
---
ज्ञानसंस्थांच्या स्वातंत्र्याबाबत जागरूक असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे तसेच संबंधित यंत्रणांनी निवडणूक लवकरात लवकर मुक्त, नि:ष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी.
- कुमार केतकर, अध्यक्षपदाचे उमेदवार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

