मुंबई महापालिकेत आता '' सीएसआर डॅशबोर्ड''; भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांची ५०० ते १००० कोटी बचतीची संकल्पना
मुंबई महापालिकेत ‘सीएसआर डॅशबोर्ड’
आमदार अमित साटम यांची निधी बचतीची संकल्पना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि पालिकेच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्र ‘सीएसआर डॅशबोर्ड’ सुरू करावा, अशी मागणी त्यांनी महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांना पत्राद्वारे केली आहे. या उपक्रमामुळे पालिकेची दरवर्षी ५०० ते १,००० कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महापालिका सध्या शालेय साहित्य, रुग्णालयांसाठी लागणारी उपकरणे, वॉटर कूलर यांसारख्या वस्तूंची खरेदी मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत (सीपीडी) निविदा काढून करते. अमित साटम यांच्या प्रस्तावानुसार, पालिकेला लागणाऱ्या अशा वस्तूंची गरज प्रथम १५ दिवसांसाठी ‘सीएसआर डॅशबोर्ड’वर प्रदर्शित केली जावी. मुंबईतील अनेक दानशूर व्यक्ती, कॉर्पोरेट कंपन्या आणि परोपकारी संस्थांना सार्वजनिक कामात योगदान देण्याची इच्छा असते. त्यांना या डॅशबोर्डमुळे एक अधिकृत प्लॅटफॉर्म मिळेल. जर १५ दिवसांत कोणत्याही संस्थेकडून प्रतिसाद मिळाला नाही, तरच पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून स्वतः खरेदी करावी.
पारदर्शकतेत भर पडेल
आपल्या पत्रात आमदार अमित साटम यांनी पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याच्या कार्यपद्धतीवर थेट भाष्य करणे टाळले असले, तरी निविदा प्रक्रियेपूर्वी सीएसआरचा पर्याय तपासणे अधिक फायदेशीर ठरेल, असे सुचवले आहे. यामुळे निविदा प्रक्रियेत होणारा विलंब आणि संभाव्य वारेमाप खर्च टाळता येईल, असा उद्देश आहे. या नावीन्यपूर्ण प्रयोगामुळे मुंबई महापालिकेच्या पारदर्शकतेत भर पडेल. वाचलेला निधी इतर मोठ्या पायाभूत सुविधांसाठी वापरता येईल, असेही साटम यांनी पत्रात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

