अफवा पसरवणे थांबवा; पालकांचा आक्रोश

अफवा पसरवणे थांबवा; पालकांचा आक्रोश

Published on

अफवा पसरवणे थांबवा; स्तुतीच्या पालकांचा आक्रोश
​मुंबई, ता. १५ : ‘आमची डॉक्टर असलेली लाघवी स्तुती आम्हाला सोडून गेली... आम्ही पूर्णपणे कोलमडून गेलो आहोत; पण आता किमान तिला न्याय मिळावा आणि तिच्या मृत्यूभोवती पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबाव्यात, हीच आमची हात जोडून विनंती आहे,’ अशा शब्दांत डॉ. स्तुती सोनावणे हिच्या पालकांनी आपली वेदना व्यक्त केली. डॉ. स्तुती सोनावणे यांनी ​८ मार्चला आत्महत्या केली. याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे; मात्र समाजमाध्यमांवर या घटनेबाबत चुकीची माहिती आणि अफवा पसरवल्या जात असल्याबद्दल तिच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये सोनावणे दाम्पत्याने सांगितले, की त्यांचा पोलिस आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना योग्य ते शासन करतील, याची आम्हाला खात्री आहे; मात्र ही चौकशी सुरू असताना कोणत्याही प्रसारमाध्यमांनी घाईघाईत चुकीची माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com