मुंबईतील फूटपाथवरील ३८५ कोटींच्या ''रेलिंग'' निविदेला ब्रेक; वादांनंतर पालिका प्रशासनाची माघार

मुंबईतील फूटपाथवरील ३८५ कोटींच्या ''रेलिंग'' निविदेला ब्रेक; वादांनंतर पालिका प्रशासनाची माघार

Published on

३८५ कोटींच्या ‘रेलिंग’ निविदेला ब्रेक
वादानंतर महापालिका प्रशासनाची माघार
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १५ : मुंबईतील फुटपाथवर नवीन रेलिंग बसवण्यासाठी काढलेली ३८५ कोटी रुपयांची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर महापालिका प्रशासनाने अखेर ती तात्पुरती स्थगित केली आहे. अनावश्यक खर्च आणि नियोजनातील त्रुटींवरून टीका झाल्यानंतर आता प्रशासनाने नवीन रेलिंगऐवजी केवळ आवश्यक ठिकाणीच दुरुस्ती करण्यावर भर देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

​मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत शहरातील विविध विभागांमधील फुटपाथवर नवीन आकर्षक रेलिंग बसवण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. मात्र, अनेक ठिकाणी सुस्थितीत असलेल्या रेलिंग काढून पुन्हा नवीन रेलिंग बसवण्याच्या या ३८५ कोटींच्या प्रस्तावावर पर्यावरणप्रेमी आणि नागरिक संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘‘हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे,’’ अशी टीका विविध स्तरांतून होत होती.

​भार हलका होणार
​निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि खर्चाच्या आवश्यकतेवरून वाढता दबाव पाहता, पालिका आयुक्तांनी या निविदेला तूर्तास स्थगिती दिली आहे. आता सरसकट सर्वच ठिकाणी नवीन रेलिंग बसवली जाणार नाहीत. त्याऐवजी ​ज्या ठिकाणी रेलिंग तुटलेली आहे किंवा गंजलेली आहे, तिथेच दुरुस्ती केली जाईल. ​सुरक्षेच्या दृष्टीने जिथे अत्यंत आवश्यकता आहे, तिथेच नवीन फिटिंग केले जाईल. ​या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवरील कोट्यवधी रुपयांचा भार हलका होण्याची शक्यता आहे.

​एकीकडे रेलिंगचा खर्च कमी करत असतानाच, पालिकेने आता हा निधी मुंबईतील इतर महत्त्वाच्या नागरी सुविधांकडे वळवण्याचे संकेत दिले आहेत. विशेषतः पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरणी आणि पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतरची प्रलंबित कामे पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com