मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक पूर्ण

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक पूर्ण

Published on

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक पूर्ण
३ एप्रिलला कार्यकारिणीची होणार निवड

मुंबई, ता. १५ : शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सर्वसाधारण सदस्यासाठी रविवारी (ता. १५) मतदान झाले. ग्रंथ संग्रहालयाच्या मध्यवर्ती, नायगाव आणि कांदिवली-आकुर्ली अशा तीन शाखांच्या १२ सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यामध्ये ३ एप्रिलला कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे.
मध्यवर्ती कार्यालयातून तीन सदस्यांपैकी संजीव भागवत, राजेंद्र कोरडे आणि दिनेश राणे निवडून आले. यामध्ये भागवत यांना ५१ मतांपैकी ५० अशी विक्रमी मते मिळाली आहेत. नायगाव शाखेतून सुरेंद्र करंबे, संदेश कदम, मकरंद केसरकर, अमेय कोंडविलकर, रवींद्र गावडे, जयवंत गोलतकर, सुरेखा भोसले, नेहा राणे विजयी झाले. कांदिवली आकुर्ली शाखेतून प्रदीप झोरे निवडून आले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या विविध शाखांमधून सर्वसाधारण सदस्यांच्या एकूण ४० जणांसाठी निवडणूक झाली. त्यातील २८ जण याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. येत्या ३ एप्रिलला कार्यकारिणीची निवड होणार आहे. निवडून आलेल्या ४० सदस्यांमधून कार्यकारिणी निवडली जाईल. कार्याध्यक्ष, मुख्य कार्यवाह, इतर कार्यवाह, खजिनदार आदी पदांची निवडणूक होणार असल्याची माहिती देण्यात आली.

यंदा सर्वाधिक मतदार
मध्यवर्ती कार्यालयात गेल्या निवडणुकीत केवळ १५ जणांनी हा हक्क बजावला होता. यंदा सर्वाधिक अशा ५१ जणांनी मतदान केले.
नायगाव शाखेतून १९१ जणांनी मतदान केले. तर आकुर्ली शाखेसाठी ४३ सदस्यांनी रविवारी मतदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com