पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक काेंडी
पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक काेंडी
एलबीएस रोडवर विकासकामांमुळे ताण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर (एलबीएस) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) विकासकामे सुरू आहेत. यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक काेंडी वाढली आहे. त्यातच चार मार्गिका असलेल्या काही ठिकाणी आता दोनच मार्गिका सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. कुर्ला, विक्रोळी, भांडुप आणि घाटकोपर परिसरातील रहिवाशांना सकाळ-संध्याकाळी दाेन-दाेन तास कोंडीत अडकून पडावे लागत आहे.
एमएमआरडीएने एलबीएस रोडवर सुरू केलेल्या कामामुळे बहुतांश वाहने पूर्व द्रुतगती मार्गावर वळवली जात आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर वडाळा, आनंदनगर, आझादनगर आणि मुलुंडपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत, असे पाेलिसांनी सांगितले. दररोज दोन तास उशीर होतो. त्यामुळे ही कामे लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे, असे प्रवासी आणि वाहनचालकांनी सांगितले.
वाहतूक विभागाने प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला दिला आहे. ठाणे-नाशिक महामार्गावरून जाणाऱ्यांनी पूर्व द्रुतगती महामार्गाचा पर्याय घ्यावा, असे आवाहन केले आहे. या कामामुळे मुंबईच्या पूर्व भागातील दैनंदिन वाहतुकीवर परिणाम झाला आहे. एमएमआरडीएने कामाचा कालावधी जाहीर केला असून, तीन महिन्यांत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
---
प्रवाशांकडून सहकार्य अपेक्षित
वाहतूक पोलिसांकडून २४ तास निरीक्षण आणि वाहतुकीचे नियोजन सुरू आहे. आम्ही योग्य नियोजन करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सिग्नल बदलले, डायव्हर्जन केले आणि अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावला आहे. आम्हाला प्रवाशांकडूनही सहकार्य अपेक्षित आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

