वर्षभरात घर खरेदीदारांच्या ६,९४५ तक्रारींचा निपटारा
वर्षभरात घरखरेदीदारांच्या ६,९४५ तक्रारींचा निपटारा
जुन्या प्रलंबित तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : सर्वसामन्य घरखरेदीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी वर्षभरात आलेल्या तब्बल सहा हजार ९४५ तक्रारींचा निपटारा केला आहे. तसेच जुन्या प्रलंबित तक्रारीही प्राधान्याने सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे तक्रारदार घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारींची नोंद वेळच्यावेळी घेतल्या जावी. न्याय्य दिलासा दिला जावा. यासाठी महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक आणि महारेराचे सदस्य महेश पाठक, रवींद्र देशपांडे यांनी तक्रारींबाबत सुनावण्यांची गती वाढविण्याचे नियोजन केले. त्यांच्या या नियोजनाला यश आले असून, अनेक प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्याचा सपाटा या तिघांनी लावला.
२०२५ या वर्षात दाखल झालेल्या पाच हजार ७३ तक्रारी आणि मागील वर्षीच्या प्रलंबित तक्रारींपैकी सहा हजार ९४५ तक्रारी निकाली काढल्या आहेत. सदरचे प्रमाण १३७ टक्के एवढे विक्रमी आहे. यापूर्वी २०२४ मध्येही ३,८६८ तक्रारी दाखल झालेल्या असताना ४,७७५ तक्रारी निकाली काढल्या होत्या.
हितांचे रक्षण करण्याची जबाबदारी
घरखरेदीदार आयुष्याची कमाई गुंतवून घर खरेदी करतो, परंतु काही कारणाने आश्वासित वेळेत त्यांना घराचा ताबा मिळाला नाही, कामाची गुणवत्ता बरोबर नाही, घरखरेदी करारात मान्य केलेल्या सोयी सवलती आणि इतरही काही बाबी नाहीत, अशा स्वरूपाच्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर घरखरेदीदारांच्या हितांचे रक्षण करण्याची जबाबदारी महारेराची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

