रमजानमध्ये मानवतेची सेहरी

रमजानमध्ये मानवतेची सेहरी

Published on

रमजानमध्ये मानवतेची सेहरी
रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत आहार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पहाटेची सेहरी अत्यंत महत्त्वाची असते; मात्र रुग्णालयांतील रुग्णांच्या नातेवाइकांना या वेळी खाद्यपदार्थ मिळवणे अनेकदा कठीण होते. ही अडचण लक्षात घेऊन ‘वी केअर फाउंडेशन’तर्फे मागील १०-१२ वर्षांपासून रुग्णालय परिसरातील गरजू नातेवाइकांसाठी विनामूल्य सेहरी वितरणाचा उपक्रम राबवला जात आहे.
दक्षिण मुंबईपासून शीवपर्यंतच्या परिसरातील केईएम, नायर, टाटा, वाडिया यासारख्या प्रमुख रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना या सेवेद्वारे मदत केली जाते. पहाटेच्या वेळी बहुतांश हॉटेल्स व खाणावळी बंद असल्याने रोजा ठेवणाऱ्यांना सेहरीसाठी अन्न मिळवणे कठीण जाते. विशेषतः रुग्णालयात रात्रभर थांबलेल्या नातेवाइकांसाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक ठरते. त्यामुळे गरजूंपर्यंत थेट सेहरीचे अन्न पोहोचवण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला. या उपक्रमांतर्गत स्वयंसेवक दररोज पहाटे रुग्णालय परिसरात जाऊन हलका, पौष्टिक आणि स्वच्छ पद्धतीने तयार केलेला आहार वितरित करतात. संपूर्ण सेवा विनामूल्य असून, समाजातून मिळणाऱ्या देणग्यांमधून या उपक्रमाचे व्यवस्थापन केले जाते. दररोज पहाटे ३.३० ते ४.३० या वेळेत संबंधित रुग्णालयांच्या प्रवेशद्वारांवर सेहरीची पॅकेट्स पोहोचवली जातात. तसेच काही खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी ‘ऑन कॉल’ सेवेद्वारेही सेहरी उपलब्ध करून दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com