‘आयआयटी’ परिसरात १० फूट लांब मगर

‘आयआयटी’ परिसरात १० फूट लांब मगर

Published on

‘आयआयटी’ परिसरात १० फूट लांब मगर
सुरक्षितरीत्या घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १६ : पवई येथील आयआयटी मुंबईच्या परिसरात आज पहाटे एक १० फूट लांब मगर आढळल्याने खळबळ उडाली; मात्र रॉ (रेस्क्यू असोसिएशन फॉर वाइल्ड लाइफ असोसिएशन आणि मुंबई वन विभागाने तातडीने संयुक्त मोहीम राबवून या मगरीला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.​
‘रॉ’चे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले, की​ आज पहाटे आयआयटीच्या सुरक्षा रक्षकांना कॅम्पसमध्ये एक मोठी मगर फिरताना दिसली. वन्यजीव मानवी वस्तीत आल्याचे लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी विलंब न लावता वन विभागाच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. पवन शर्मा यांनी पुढे सांगितले, की​ घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि आमच्या संस्थेचे तज्ज्ञ बचावकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टीमने अतिशय कौशल्याने आणि सुरक्षितरीत्या या मगरीला ताब्यात घेतले. ही मगर ‘मार्श क्रोकोडाईल’ (खारीतील मगर) प्रजातीची आहे.
​​रेस्क्यू करण्यात आलेल्या मगरीला सध्या वन विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ​पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून मगरीची सखोल आरोग्य तपासणी केली जात आहे. तिला काही काळ निरीक्षणाखाली ठेवले जाईल. प्रकृती उत्तम असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आणि आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिला पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल, असेही सांगण्यात आले. ​पवई तलाव परिसरात मगरींचा वावर नैसर्गिक असला तरी शैक्षणिक संकुलात मगर शिरल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते; मात्र यशस्वी बचावकार्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com