एक किलाेमीटरची अट शिथिल

एक किलाेमीटरची अट शिथिल

Published on

एक किलाेमीटरची अट शिथिल

‘आरटीई’ प्रवेश अर्जासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई, ता. १६ : आरटीई प्रवेशासाठी एक किलाेमीटर परिसरातील शाळांची निवड करण्याची असलेली अट आज प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिथिल केली. यामुळे तीन किलाेमीटर अंतरातील शाळांचे पर्याय निवडीची मुभा मिळणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने पालकांना अर्ज अद्ययावत करण्याची संधी मिळणार आहे.

शाळा निवडीसंदर्भात असलेली एक किलेमीटर परिसराची अट रद्द केल्याचा आदेश साेमवारी (ता. १६) प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केला आहे. यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या पालकांना अर्जात सुधारणा करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच पुनश्च अर्ज कन्फर्म करण्याबाबत सहकार्य करण्यात यावे, असे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी म्हटले आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या धोरणात शालेय शिक्षण विभागाने बदल केले होते. त्यामध्ये एक किलाेमीटर परिसरात असलेल्या शाळांची निवड आरटीई प्रवेशासाठी करण्याची मुभा देण्यात आली होती. यामुळे असंख्य पालकांना विशेषतः शहरी भागांत शाळा उपलब्ध होत नव्हत्या. तसेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे शालेय शिक्षण विभागावर विविध पालक संघटनांनी आक्षेप नोंदवले होते. विधान मंडळातही एक किलाेमीटर परिसराची अट रद्द करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती. त्यानंतरही शालेय शिक्षण विभागाने कोणताच बदल केला नव्हता. या पार्श्वभूमीवर काही पालक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. यावरून या अटीसंदर्भात शालेय शिक्षण विभागाला खंडपीठाने धारेवर धरल्यानंतर विभागाने सुधारित आदेश जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com