सीईटी प्रवेश नोंदणीस मुदतवाढ

सीईटी प्रवेश नोंदणीस मुदतवाढ

Published on

सीईटी प्रवेश नोंदणीस मुदतवाढ
मुंबई, ता. १६ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या एलएलबी (५ वर्षीय) व नर्सिंग, डीपीएन, पीएचएन (वैद्यकीय) या विविध अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे.
एलएलबी (५ वर्षीय) या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख १५ मार्च २०२६ होती. या प्रवेश नोंदणीला आता ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. बी.एस्सी नर्सिंग व डीपीएन, पीएचएन (वैद्यकीय) या सीईटीच्या प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख १६ मार्च होती. ती आता २५ मार्च २०२६ असेल. आजपर्यंत १७ अभ्यासक्रमाच्या सीईटीला १२ लाख ९९ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली असून दोन संधी मिळून १७ लाख ४७ हजार ४८२ विद्यार्थी यावर्षीची प्रवेश परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com