सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास!

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना 
पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास!
Published on

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना
पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास!
प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढणार; परिवहनमंत्र्यांचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सरनाईक यांनी विधान भवन येथे बैठक घेतली. या वेळी कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
एसटी महामंडळातील सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने चालक-वाहकांवरील कारवाई, आगार व्यवस्थापनातील अडचणी तसेच काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या बैठकीत मांडल्या. संघाचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत तसेच पदाधिकाऱ्यांसोबत सरनाईक यांनी सकारात्मक चर्चा केली. सामान्य प्रवाशांना उत्तम सेवा देणे हेच एसटीचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे चालक, वाहकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी, आगार स्तरावरील निर्णय प्रक्रिया तसेच शिस्तभंग कारवाईच्या बाबतीत न्याय्य व पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी या वेळी दिले.
----
पर्यवेक्षक, अधिकाऱ्यांच्या बदल्या
एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश सरनाईक यांनी प्रशासनाला दिले. यासंदर्भात कर्मचारी संघटनांच्या भावना तीव्र असून, या प्रक्रियेची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचनाही दिल्या.
===
कर्मचारी संघटनांशी नियमित संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत एसटी प्रशासन सकारात्मक आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर शक्य तितक्या लवकर कार्यवाही करण्याची महामंडळाची भूमिका आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com