गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी!

गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी!
Published on

गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी!
महिला बचत गटांना बळ; महापालिकेचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १७ : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईकरांना घरगुती चवीच्या पुरणपोळ्या उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. पालिकेद्वारे अर्थसहाय्यित महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘पुरणपोळी महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले असून, मुंबईकरांना आता ऑनलाइन मागणीनुसार घरपोच स्वादिष्ट पुरणपोळ्या मिळणार आहेत.
​महापालिकेतर्फे मुंबईतील होतकरू महिलांसाठी विविध रोजगारभिमुख योजना राबवल्या जातात. याअंतर्गत स्थापन झालेल्या महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ देऊन स्वावलंबी करण्यात आले आहे. हे गट दागिने, बॅग, आकाशकंदील आणि मेणबत्त्यांसारख्या वस्तूंच्या निर्मितीसोबतच खाद्यपदार्थ निर्मितीतही अग्रेसर आहेत. त्यांच्या या कौशल्याला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती देण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे.
या महोत्सवांतर्गत स्थानिक बचत गटांनी अत्यंत स्वच्छतेने आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या मऊ, लुसलुशीत पुरणपोळ्या उपलब्ध असतील. ३ ते १० पुरणपोळ्यांच्या सोयीस्कर पॅकमध्ये उपलब्ध असतील. अवघ्या १५० रुपयांपासून पुरणपोळी आपल्याला खरेदी करता येणार आहे.

​गुढीपाडव्याच्या दिवशी घरपोच डिलिव्हरीची सुविधा.
मुंबईकरांनी या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक नागरिकांनी https://shgeshop.com या संकेतस्थळावर आपली मागणी नोंदवायची आहे. नोंदणी केलेल्या ग्राहकांना गुरुवारी (ता. १९) रोजी घरपोच पुरणपोळी पुरवली जाईल, अशी माहिती नियोजन संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com