म्हाडाच्या लॉटरीत शिरढोन, खोनीच्या घरांचा समावेश होणार

म्हाडाच्या लॉटरीत शिरढोन, खोनीच्या घरांचा समावेश होणार

Published on

म्हाडाच्या लॉटरीत शिरढोण, खोणीच्या घरांचा समावेश होणार
आठ हजार घरांची संख्या; पहिल्या लॉटरीत विक्री न झालेली घरे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लवकरच ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील घरांची लाॅटरी काढली जाणार असून, त्यामध्ये मागील लाॅटरीत विक्री न झालेल्या शिरढोण आणि खोणी येथील सुमारे आठ हजार घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळणार, याकडे म्हाडाबरोबरच सर्वसामान्यांचे लक्ष लागणार आहे.
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडून दरवर्षी लाॅटरी काढली जात आहे. त्यानुसार कोकण मंडळाकडून महिनाभरात लाॅटरीची जाहिरात काढली जाणार आहे. त्या अनुषंगाने घरांची जमवाजमव सुरू केली आहे. त्यामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या घरांबरोबरच खासगी विकसकांकडून २० टक्क्यांतर्गत मिळणारी घरे आणि मागील लाॅटरीत विक्री न झालेल्या घरांचा सामावेश केला जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. २०२५ मध्ये काढलेल्या लाॅटरीत विक्री न झालेल्या शिरढोण येथील ५३२०, तर खोणी येथील २७४४ घरांचा येत्या लाॅटरीत समावेश केला जाणार आहे. त्याला मुंबईसह एमएमआरमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्वसामान्यांकडून कसा प्रतिसाद मिळणार, हे महत्त्वाचे आहे.

घरांची जमवाजमव
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून काढल्या जाणाऱ्या लाॅटरीत जास्तीत जास्त घरे असावीत म्हणून प्रशासनाने खासगी विकसकांकडून उपलब्ध होणाऱ्या घरांची झाडाझडती सुरू केली आहे. त्याकरिता सदर कार्यक्षेत्रात असलेल्या महापालिकांकडून त्याच्या परिसरात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com