जे.जे.सह तीन महाविद्यालयांना स्वायत्तत्ता?
जे.जे.सह तीन महाविद्यालयांना स्वायत्तत्ता?
समिती स्थापन; तीन महिन्यांत अहवाल सादर करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईतील ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर जे.जे. रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला स्वायत्तता देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बाठिया यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती तीन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.
संबंधित संस्थांची सध्याची प्रशासकीय व शैक्षणिक रचना, स्वायत्ततेची आवश्यकता, त्याचे संभाव्य फायदे तसेच देश-विदेशातील यशस्वी नमुन्यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे. यासाठी दिल्लीतील एम्स, टाटा मेमोरियल केंद्र, पीजीआय चंडीगड यांसारख्या संस्थांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यात येणार आहे. समितीत टाटा मेमोरियल रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बडवे, केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. संजय ओक, जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राजेश कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडील अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतील. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि नागपूरमधील या शासकीय संस्थांना स्वायत्तता देण्याबाबत समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

