लाचखोर सहायक निरीक्षक ताब्यात
लाचखोर सहाय्यक निरीक्षक ताब्यात
मुंबई, ता. १७ : सकारात्मक चौकशी अहवाल देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागून त्यातील दीड लाख रुपये स्वीकारताना वांद्रे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक तुषार काळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. १६) करण्यात आली. आरोपी पोलिस अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला, असे एसीबी प्रवक्त्याने सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या भावाने मालमत्तेप्रकरणी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने वांद्रे पोलिसांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्याची जबाबदारी काळे यांच्यावर देण्यात आली होती. त्यांनी तक्रारदाराच्या भावाचा जबाब नोंदवल्यावर चौकशी अहवाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी तीन लाख रुपये मागितले.

