उपमहापौरांच्या अपमानप्रकरणी शिवसेना आक्रमक

उपमहापौरांच्या अपमानप्रकरणी शिवसेना आक्रमक

Published on

उपमहापौरांच्या अपमानप्रकरणी शिवसेना आक्रमक
महापौरांच्या अनुपस्थितीत उपमहापौर हेच सभेचे प्रमुख असतात. राजशिष्टाचारानुसार त्यांना अग्रमानाचे आसन मिळणे अपेक्षित असते; मात्र ​‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धेच्या नोंदणी कार्यक्रमात उपमहापौर संजय घाडी यांना चौथ्या क्रमांकाचे आसन देण्यात आले. या कृतीमुळे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा अवमान झाल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने प्रशासनावर टीका केली आहे. गटनेते अमेय घोले यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com