विद्यापीठांनी ‘स्कुल-कनेक्ट’अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे

विद्यापीठांनी ‘स्कुल-कनेक्ट’अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे

Published on

विद्यापीठांनी ‘स्कूल-कनेक्ट’अंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावे
त्रैमासिक अहवाल नियमितपणे सादर करण्याचे राज्यपालांचे आदेश

मुंबई, ता. १८ : ‘राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, या दृष्टीने विद्यापीठांनी शाळांशी संपर्क वाढवावा व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावे, या दृष्टीने ‘स्कूल-कनेक्ट’ या कार्यक्रमाअंतर्गत विद्यापीठांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावे. हा कार्यक्रम राबवताना नवीनता व चाकोरीबाहेरच्या संकल्पना रुजू कराव्यात आणि प्रत्येक तीन महिन्यांनी या उपक्रमांचा अहवाल नियमितपणे सादर करावा.’ असे आदेश कुलपती तथा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दिले.

राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच राज्यपालांनी मंगळवारी (ता. १७) राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंशी लोकभवन, मुंबई येथून दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. या वेळी विद्यापीठांनी आपले राष्ट्रीय मानांकन सुधरावे व त्यासाठी वेळोवेळी लक्ष निर्धारित करावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरूंना केली. महिला सक्षमीकरण तसेच कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून महिलांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी सुरू केलेला ‘स्वयंसिद्धा’ हा उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण असून, तोदेखील विद्यापीठांनी गांभीर्यपूर्वक राबवावा, अशी सूचना राज्यपालांनी केली. ‘स्कूल-कनेक्ट’ व ‘स्वयंसिद्धा’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा लोकभवनतर्फे घेण्यात येईल, असे सांगून विद्यापीठांनी या दोन्ही उपक्रमांसंदर्भात आपला त्रैमासिक अहवाल नियमितपणे लोकभवन येथे पाठवावा, असे राज्यपालांनी सांगितले. या वेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यापीठांतर्फे सुरू असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठांचे राष्ट्रीय मानांकन, महिला सक्षमीकरण, स्वयंसिद्धा उपक्रम, कौशल्य विकास आदींविषयी माहिती दिली.


..
उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना चषक
‘स्कूल-कनेक्ट’ व ‘स्वयंसिद्धा’ या दोन्ही उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यापीठांना पदक किंवा चषक प्रदान करण्याबाबत विचार केला जाईल, ज्या विद्यापीठांचे उपक्रम यशस्वी ठरतील, त्या विद्यापीठांचे उपक्रम इतर विद्यापीठांमध्ये राबवले जातील, असेही राज्यपालांनी सांगितले. आपण लवकरच सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com