दुसऱ्या दिवशी वितरणाची हमी देणारी ‘२४ स्पीड पोस्ट’

दुसऱ्या दिवशी वितरणाची हमी देणारी ‘२४ स्पीड पोस्ट’

Published on

दुसऱ्या दिवशी वितरणाची हमी देणारी ‘२४ स्पीड पोस्ट’

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या सहा प्रमुख महानगरांदरम्यान दुसऱ्या दिवशी वितरणाची हमी असलेली नवीन सेवा ‘२४ स्पीड पोस्ट’ भारत सरकारच्या टपाल विभागाने आज राष्ट्रीय स्तरावर सुरू केली आहे.
या सेवेच्या माध्यमातून पत्र, कागदपत्रे आणि लहान पार्सल यांची जलद, सुरक्षित आणि वेळेत वितरणाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. सेवेच्या अंगभूत वैशिष्ट्यांमध्ये रिअल टाइम ट्रॅकिंग, ओटीपी आधारित वितरण पुष्टी आणि विलंब झाल्यास भरपाई यांचा समावेश आहे. टपाल विभागाकडे असलेल्या देशव्यापी वाहतूक नेटवर्क, समर्पित प्रक्रिया यंत्रणा आणि प्राधान्य हवाई वाहतुकीचा वापर करून ही सेवा विकसित करण्यात आली आहे. यामुळे ई‑कॉमर्स कंपन्या, वित्तीय संस्था, सरकारी विभाग तसेच वैयक्तिक ग्राहकांना वेळेवर पोहोचणारी विश्वासार्ह लॉजिस्टिक्स सेवा मिळणार आहे. २४ स्पीड पोस्टसोबतच ‘२४ स्पीड पोस्ट पार्सल’ आणि ‘४८ स्पीड पोस्ट’ या दोन अतिरिक्त प्रीमियम सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्यवसायाला चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com