तेल फलाटावरील
चोरट्यांना अटक

तेल फलाटावरील चोरट्यांना अटक

Published on

तेल फलाटावरील
चोरट्यांना अटक
मुंबई, ता. १८ ः अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या तेल फलाटावरील लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक सामग्रीची चोरी करणाऱ्या तिघांना येलो गेट पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून सुमारे ११ लाख मूल्य असलेल्या ४९ बॅटरी बँक हस्तगत केल्या. चोरीसाठी वापरण्यात आलेली मासेमारी बोट जप्त केली. चंद्रकांत पाटील, संतोष पाटील आणि विद्याधर म्हात्रे अशी अटक आरोपींची नावे असून ते पेण जिल्ह्यातील दादर, वशेणी गावातील रहिवासी आहेत. मार्च महिन्यात तेल फलाटावरील सामग्री चोरीच्या चार घटना घडल्या. स्वतंत्र गुन्हे नोंदवून येलो गेट पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने ही गुन्हे उघडकीस आणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com