बोअरवेल खोदताना मेट्रोच्या बोगद्याला छिद्र
बोअरवेल खोदताना
मेट्रोच्या बोगद्याला छिद्र
मुंबई, ता. १८ ः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक परिसरात मेट्रो चित्रपटगृहाजवळ पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी कंत्राटदाराकडून बोअरवेल खोदताना मेट्रो मार्गिकेच्या बोगद्याला छिद्र पडले. याप्रकरणी चंद्रमा वॉटर सप्लाय प्रा. लि. कंपनीचे मालक रामबाबू राय यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (ता. ५) घडली. मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूंनी ५० मीटर परिसरात कोणतेही खोदकाम किंवा बांधकाम करण्यापूर्वी एमएमआरसी आणि महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे; मात्र या कंपनीने परस्पर खोदकाम सुरू केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

