रिक्षात बसण्यावरून 
झालेल्या वादात हत्या

रिक्षात बसण्यावरून झालेल्या वादात हत्या

Published on

रिक्षात बसण्यावरून
झालेल्या वादात हत्या
मुंबई ः कुर्ला पूर्वेकडील न्यू रेल्वे कॉलनी परिसरात रिक्षात बसण्यावरून झालेल्या वादात अल्पवयीन तरुणाने चालकाची हत्या केली. नेहरूनगर पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेत बालसुधारगृहात धाडले. जयराज नायडू (वय ४८) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायडू हे खासगी कंपनीत नोकरी करत आणि सुट्टीच्या दिवशी रिक्षा चालवत. त्यांची रिक्षा घरासमोरच उभी असे. बंद रिक्षात मैत्रिणीसोबत बसण्यावरून नायडू यांनी आरोपीला याआधी हटकले होते. घटना घडली त्या दिवशीही आरोपी रिक्षात आढळल्याने नायडू यांनी त्यास हटकले. त्यावरून आरोपीने वाद घातला आणि नायडू यांच्यावर भररस्त्यात चाकूने वार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com