सात वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहूनही घर मिळेना!

सात वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहूनही घर मिळेना!

Published on

सात वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहूनही घर मिळेना!
ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांचा नाराजीचा सूर; सरकारसह म्हाडाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत वरळी आणि नायगाव बीडीडीतील रहिवाशांना घराचा ताबा मिळू लागला असला तरी ना. म. जोशी मार्ग चाळीतील रहिवाशांना अद्याप प्रतीक्षाच आहे. पुनर्विकासातून लवकर घरे मिळावी, यासाठी सात वर्षांपूर्वी सर्वात आधी येथील रहिवाशांनी घरे रिकामी करीत संक्रमण शिबिरात जाणे पसंत केले. मात्र सरकारसह म्हाडाचे आमच्या पुनर्विकासाबाबत दुर्लक्ष होत असल्याने आम्हाला अद्याप घरे मिळू शकली नसल्याचा आरोप ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीकडून केला जात आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या प्रक्रियेत वरळी येथील रहिवाशांना सर्वप्रथम घरांचा ताबा देण्यात आला. त्यानंतर नायगाव येथील रहिवाशांनाही घरे देण्यात आली. त्या रहिवाशांना घरे मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. परंतु पुनर्विकासासाठी सर्वात आधी पुढाकार घेणाऱ्या ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांना मात्र अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक असल्याचा आरोप ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी केला आहे. तसेच पुनर्विकसित इमारतीत एकास एक पार्किंग ही महत्त्वाची मागणी रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही मांडली आहे. मात्र या मागणीवर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. रहिवाशांच्या मागण्या केवळ ऐकून घेतल्या जातात; परंतु त्या पूर्ण करण्याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत, अशी नाराजी व्यक्त होत आहे.

संथ गतीने काम सुरू
सध्या ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील रहिवासी गेली सात वर्षे संक्रमण शिबिरात राहून कठीण परिस्थितीचा सामना करीत आहेत. कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले अनेक अडचणींना तोंड देत आहेत. अशातही रहिवाशांनी संयम राखत प्रशासनाकडून घर मिळण्याची अपेक्षा ठेवली आहे. पुनर्विकासाचे काम संथ गतीने सुरू आहे. प्रत्यक्षात घरांचा ताबा देण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नसल्याची खंत रहिवासी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com