लालबाग-परळमध्ये मर्दानी खेळ, मल्लखांबाचे प्रात्यक्षिक

लालबाग-परळमध्ये मर्दानी खेळ, मल्लखांबाचे प्रात्यक्षिक

Published on

लालबाग-परळमध्ये मर्दानी खेळ, मल्लखांबाचे प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : ‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या वतीने हिंदू नववर्षाच्या निमित्ताने परळ ते लालबाग येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य शोभायात्रेत मर्दानी खेळ, मल्लखांबाचे प्रात्यक्षिक आकर्षण ठरले. शिवशंभो क्रिएशनतर्फे ऐतिहासिक संदर्भांवर आधारित श्री शिवराज्याभिषेकाचे थ्रीडी शिल्प, दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे विविध गड-दुर्गांच्या प्रतिकृती, महिला संस्थांकडून मर्दानी खेळ व मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले गेले. या वेळी विभागातील विविध संस्था तसेच विभागीय गणेशोत्सव मंडळांनी या शोभायात्रेची उत्साहात स्वागत केले. या वेळी तरुणाईसोबत बच्चेकंपनीचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा होता. स्वामी समर्थ मठ परळ येथून सुरू झालेल्या शोभायात्रेची सांगता गिरणगावचा राजाच्या प्रांगणात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com