ऑलिम्पिक खेळाडूंना 
१५ हजार निवृत्तीवेतन द्या

ऑलिम्पिक खेळाडूंना १५ हजार निवृत्तीवेतन द्या

Published on

ऑलिम्पिक खेळाडूंना
१५ हजार निवृत्तीवेतन द्या
प्रवीण दरेकर यांची सरकारला विनंती
मुंबई, ता. १९ ः राज्यातील महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी विजेत्या खेळाडूंना राज्य सरकार १५ हजार रुपये निवृत्तीवेतन देते; मात्र ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना त्यापेक्षा कमी निवृत्तीवेतन मिळते. या दोघांच्याही निवृत्तीवेतनात समानता आणावी, अशी मागणी विधान परिषदेतील भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केली.
ऑलिम्पिकसाठी भारतातून लाखो खेळाडू प्रयत्न करतात, मात्र त्यातील मोजक्याच खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले नाही, तरी स्पर्धेत भारतातर्फे खेळणेही तितक्याच सन्मानाची गोष्ट आहे. म्हणूनच प्रत्येक ऑलिम्पिक खेळाडूला सरकारमार्फत सन्मान म्हणून १० हजार रुपयांचे निवृत्तीवेतन दिले जाते. पूर्वी ही रक्कम चार हजार रुपये होती. नंतर त्यात वाढ केली. आपण राज्यातील महाराष्ट्र केसरी व हिंदकेसरी विजेत्यांना १५ हजार रुपयांचे निवृतीवेतन देतो; मात्र ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना त्यापेक्षा कमी निवृत्तीवेतन आहे. त्यामुळे ऑलिम्पिक आणि महाराष्ट्र केसरी व हिंदकेसरी यांच्या पेन्शनमध्ये समानता आणावी. सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती दरेकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com