जप्त जहाजांप्रकरणी भूमिका स्पष्ट करा!
जप्त जहाजांप्रकरणी भूमिका स्पष्ट करा!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : कथित बेकायदा कृत्यांसाठी जप्त केलेल्या तीन जहाजांच्या मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकांची दखल घेऊन भारतीय तटरक्षक दलासह केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने दिले.
गेल्या महिन्यात बाल्बोआ शिपिंग, स्टार मॅनेजमेंट शिपिंग आणि रॉयल प्रिन्सेस शिपिंग यांच्या मालकीच्या तीन जहाजांसह तीन खलाशांना तटरक्षक दलाच्या तक्रारीवरून, येलो गेट पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली होती. त्याविरोधात कंपनीच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. प्रतिवाद्यांना तत्काळ जहाजे सोडण्याचे आणि नौकानयनाच्या परवानगीचे आदेश देण्याची प्रमुख मागणी याचिकेत केली आहे. त्या याचिकेवर नुकतीच न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने तटरक्षक दल आणि केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तिन्ही जहाजांच्या हालचालींवरून त्यांचे शेजारील देशाशी संगनमत असल्याचे दर्शवत होते. २० आणि २१ जानेवारीमध्ये एक जहाज पाकिस्तानच्या क्षेत्राजवळ आढळून आले. तिन्ही जहाजांची स्वयंचलित ओळख प्रणाली वेगवेगळ्या ठिकाणी बंद करण्यात आल्याचे तटरक्षक दलाकडून युक्तिवाद करताना सांगण्यात आले. तसेच ‘व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी’ रेडिओच्या आधारे या जहाजांचे स्थान शोधून काढून जहाजांनी पाठवलेली माहिती पाकिस्तानजवळील प्रत्यक्ष ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणाची होती, असेही न्यायालयाला माहिती देण्यात आली. दुसरीकडे, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या आरोपांचे खंडन केले आणि याप्रकरणी माहिती घेऊन उत्तर दाखल करण्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी ६ एप्रिलला ठेवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

